पाली : प्रतिनिधी
बाळासाहेबांच्या शिवसेनेने निगडे ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा रोवला आहे. शेकापच्या माजी सभापती दर्शना म्हात्रे यांचा पराभव करून शिंदे गटाच्या कल्पना संजय म्हात्रे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हा प्रमूख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निगडे ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार कल्पना संजय म्हात्रे यांना 678 मते मिळाली तर शेकापच्या दर्शना यशवंत म्हात्रे यांना 544 मते मिळाली. 134 मतांनी कल्पना म्हात्रे विजयी झाल्या. विजयानंतर कल्पना म्हात्रे यांची खारपाले, निगडे गावातून भव्य रॅली काढण्यात आली होती. आमदार महेंद्र दळवी, माजी जि. प सदस्या मानसी दळवी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख राजा केणी, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे, सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख, उपजिल्हा प्रमुख अनुपम कुलकर्णी आदींनी विजयी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले.
विजयी उमेदवार
सरपंच : कल्पना म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य : पांडुरंग पोशा म्हात्रे, बबन गोसावी म्हात्रे, अविनाश पांडुरंग म्हात्रे, चंद्रकांत रामदास मोकल, शोभा धनाजी भोईर, प्रतीक्षा दीपक म्हात्रे, अंजली सुभाष नाईक, रवीना यशवंत नाईक