Breaking News

कामोठे, नावडे येथे 11 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे आणि नावडे येथे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या सुमारे 11 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 15) झाले.
पनवेल महपालिका क्षेत्राचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास होत असून त्यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे सुरू होत आहेत. त्यानुसार कामोठे गावात तीन कोटी 88 लाख, 59 हजार 560 रुपयांच्या निधीमधून मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, सात कोटी 16 लाख 22 हजार 700 रुपयांच्यानिधीमधून स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन बांधणे तसेच रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि 56 लाख, 89 हजार 878 रुपयांच्या निधीमधून नावडे गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सुमारे 11 कोटी 61 लाख 72 हजार 138 रुपयांच्या या विकास कामांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
कामोठे येथे झालेल्या विकासा कामांच्या शुभारंभावेळी माजी नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, डॉक्टर अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका कुसूम म्हात्रे, हेमलता गोवारी, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, रवी म्हात्रे, शांताराम भगत, किशोर गोवारी, अनिल गोवारी, भाऊ भगत, कामोठे शहर महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, प्रदीप भगत, सचीन पेटकर, विज्ञा तामखेडे आदी उपस्थित होते.
नावडे येथील कामांच्या शुभारंभावेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, सुरेश खानावकर, कृष्णा पाटील, नंदू म्हात्रे, नितेश पाटील, भरत खानावकर, बळीराम खानावकर, तुकाराम खानावकर, पंढरीनाथ खानावकर, मदन खानावकर, विशाल खानावकर, शुभम खानावकर, प्रभाकर खानावकर, परशुराम खुटारकर, नीरज खानावकर, तुषार खानावकर, राजेश पाटील, हेमंत कांबळे, प्रशांत खानावकर आदी उपस्थित होते.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply