Breaking News

नवीन पनवेलमध्ये विजेचा खेळखंडोबा

नगरसेवक समीर ठाकूर यांचे महावितरणला निवेदन; मोर्चा काढण्याचा इशारा

पनवेल : वार्ताहर

उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच नवीन पनवेलमध्ये वारंवार वीज खंडित होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्याच्या दिवसात नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक वेळा वीज खंडित होत आहे. यासोबतच वीज खंडित होण्याची वेळ आठ ते दहा तासांची असते. यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक समीर ठाकूर यांनी महावितरणला निवेदन दिले आहे. यामधून त्यांनी ही समस्या त्वरीत न सोडविल्यास कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे.

वीज खंडित झाल्यावर लोकप्रतिनिधी वीज वितरण अधिकारी वीज खंडित बद्दल फोन करतात, मात्र अधिकारी नेहमीप्रमाणे उत्तर मिळत आहे. आजही अनेक शाळांचे विद्यार्थी ऑनलाइन वर्ग सुरू आहे, तर अनेक सोसायटीमधील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना वारंवार वीज खंडीत होत असल्याने उकाड्याचा त्रास होत आहे. नवीन पनवेल अनेक भागात डीपी उघड्या असून वीज मंडळच्या विद्युत तारा जीर्ण झाल्या आहेत. नगरसेवक समीर ठाकूर यांनी नवीन पनवेलच्या वीज वितरण कार्यालयामध्ये अधिकारी सरोदे दहिफळे यांना वीज खंडित समस्येबद्दल विचारणा करून निवेदन दिले. यासोबतच या समस्येवर लवकर लवकर उपाय करावी; अन्यथा वीज वितरणच्या विरोधात आंदोलन करू अशी समज दिली.

या वेळी नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेविका राजेश्री वावेकर, शोभा सातपुते, यमुना प्रकाशन, मिलिंद म्हात्रे, संजय मोरे, अमित खैरे तन्मय ब्रिज आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply