Breaking News

खालापूरच्या शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा कालवा दुरुस्त करून दिलासा देण्याची मागणी

खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील माजगाव, आंबिवली, वारद, पौंध तसेच या परिसरातील जोडणार्‍या आदिवासीवाड्या असून सन 2017पासून कालवे कोरडे पडले आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना उन्हाळी भातलागवड करता येत नाही. याबाबत आता नव्याने स्थापन झालेले सरकार गांभिर्याने निर्णय घेईल, अशी आशा येथील शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यातील कालव्या 2017पासून पाणी न सोडल्याने परिसरातील शेतकर्‍यांची मोठी गैरसोय होत आहे. पाणी नसल्यामुळे शेतकर्‍यांना उन्हाळी भातपीक घेता येत नाही. शिवाय कालव्याचीही दुरवस्था झाली आहे. सन 2017मध्ये पाणी सोडण्यात आले, मात्र ते शेवटपर्यंत पोहचले नाही. यामुळे कालवा दुरुस्त झाल्याशिवाय पाणी पोहचवू शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. याबाबत शासनाने गांभिर्याने विचार करून कालव्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

खरसुंडी बंधार्‍यातून पाणी हे कालव्याला सोडले जावे, यासाठी प्लॅस्टिकच्या पाईपऐवजी लोखंडी पाईप बसविण्यात आले आहेत. शिवाय या कालव्याची दुरुस्ती करण्याचे काम इंजिनिअरकडे दिले आहे.लवकरात लवकर काम सुरू केले जाईल.
-भारत गुंटुरकर, उपविभागीय अभियंता

कालव्याला पाणी येत असल्यामुळे दरवर्षी भातलागवड होत असे. शिवाय गुरांच्या पिण्याच्या प्रश्न, विहिरीला पाणी राहत असे, मात्र सात ते आठ वर्षांपासून पाणी बंद झाल्यामुळे भातलावड करता येत नाही.
-रवि काठावले, शेतकरी माजगाव

 

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply