Breaking News

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

30 जानेवारीला मतदान, तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यसंख्या ही 78 आहे. त्यामध्ये आता पदवीधरच्या दोन आणि तीन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने नव्या वर्षातील राजकीय रणसंग्राम सुरू होणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply