मुरुड : प्रतिनिधी
मुरुड श्रीवर्धन तालुक्यात अगदी सहज प्रवास करता यावा म्हणून जंगल जेट्टीची सुविधा महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून करून देण्यात आली आहे. या जेट्टीमध्ये मोठ्या बसेसना स्थान दिल्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. आगरदांडा ते दिघी 15 मिनिटाच्या अंतरासाठी प्रवाशी वर्गाना मोठी किंमत मोजून प्रवास करावा लागत आहे. दिघी क्वीन व सुवर्णदुर्ग मारिन सर्व्हिसेस या दोन रो-रो सेवेअंतर्गत प्रवाश्याना सुविधा पुरविली जात आहे.आगरदांडा वरून या रो-रो-सेवा दिघी पर्यंत नेल्या जातात. त्यामुळे श्रीवर्धन तालुका अगदी नजीक आला आहे. या रो-रो सेवेमधून पर्यटक, नागरिक, शालेय मुले आदी प्रवास करीत असतात. रो-रो सेवेची क्षमता हि फक्त लहान चार चाकी गाडयांची असताना आता यामधून मोठे ट्रक व एसटी याना सुद्धा प्रवेश देण्यात आल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांची कुचंबणा होत आहे.मोठ्या अवजड वाहनांमुळे लहान चार चाकी गाडयांना पर्याप्त जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या दुचाकी गाडयांना हि मोठी वाहने डोकेदुखी ठरत आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून रो-रो सेवेला फक्त लहान गाडयांची अनुमती असताना मोठी अवजड वाहने घेतल्याने लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.येथील स्थानिक व पर्यटकांनी मोठी अवजड वाहने यांनी रस्त्यावरून प्रवास करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.मोठ्या वाजेद वाहनांमुळे चारचाकी लहान गाडयांना रो-रो-मध्ये स्थान मिळत नसल्याची तक्रार होऊ लागल्या आहेत.याबाबत महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने दिघी-आगरदांडा चालणार्या रो-रो सेवांना अवजड वाहने न नेण्याची तंबी द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. याबाबत माजी नगरसेवक गिरीष साळी यांनी सांगितले, आगरदांडा ते दिघी जलमार्गावर महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून रो-रो सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रो-रो-सेवा यांचा आकार लहान असून यामधून मोठ्या वजनाची क्षमता असणारी अवजड वाहनांची वाहतूक करण्याची परवानगी नसताना या बोटी अवजड वाहतूक करतात याकडे बोर्डाने लक्ष देणे आवश्यक आहे. अवजड वाहनांना रस्त्याने वाहतूक करणे बंधनकारक आहे परंतु याना रो-रो सेवेत स्थान देणे हे चुकीचे आहे. अवजड वाहतूक बंद करा अन्यथा प्रवासी वर्गाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.