Breaking News

कामोठे क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवास परेश ठाकूर यांची भेट

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 10 वा कामोठे कला, क्रिडा व सांस्कृतीक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचे तसेच सामाजिक क्षेत्रातील मानयवरांना कामोठे भूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. कामोठेकरांना या महोत्सवांतर्गत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. 2 जानेवारीपासून सुरू असलेला महोत्सवात बुधवारी सांस्कृतीक कार्यक्रम आणि पारितोषक वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी सुषमा पाटील विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष गोपीनाथ गोवारी, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ  निरीक्षक स्मिता जाधव आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply