Breaking News

पनवेल पोलिसांकडून अनाथांना मदत

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पोलिसांनी उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकीसह सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील वांगणी गाव येथे असलेल्या सील आश्रम नामक सेवाभावी संस्थेला मदतीचा हात दिला आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गुरुवारी (दि. 15) केले.

पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वांगणी गाव येथे सील आश्रम सेवाभावी संस्था कार्यरत आहे. तेथे अनाथ, बेवारस व रस्त्यावर जखमी अवस्थेत मिळुन येणारे फिरस्ते व्यक्ती, महिला व अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांची शुश्रूषा व पालनपोषण केले जाते. त्यांचे पालक, नातेवाईक मिळून येताच त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देण्यात येत असते. सध्या तेथे एकूण 276 पिडीत व्यक्ती दाखल आहेत. पोलिसांना मिळून आलेले बेवारस व्यक्तींनाही सदर संस्थेत दाखल करीत असल्याने त्यांची पोलीस विभागास सातत्याने मोलाची मदत होत असते. सध्या शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे या संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर जैनम्मा यांनी सध्या त्यांचे संस्थेत असलेले पीडिताना दैनंदिन गरजेसाठी आवश्यक वस्तू व अन्नधान्य अपुरे असल्याने पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांना संपर्क साधून चिंता व्यक्त केली होती.

ही बाब पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी या संस्थेस तत्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या असता त्यानुसार पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या उपस्थितीत वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर, अंकुश खेडकर, नेरे बीट अधिकारी सहाय्यक निरीक्षक राम गोपाळ व अंमलदार मिळून सील आश्रम, वांगणी येथे भेट देऊन त्यांना साखर 150 किलो, रवा 150 किलो, आटा 200 किलो, चना 120 किलो, तूरडाळ  120 किलो, पोहे 200 किलो, 15 लीटर सॅनिटायजर, 500 मास्क, तीन हजार पाकीट सी-विटामिन व झिंक गोळ्या इत्यादी सात दिवस पुरेल इतका अन्नसाठा व इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला व भविष्यातदेखील करू असे आश्वासन दिले.

या वेळी संस्थेचे संस्थापक फादर के. एम. फिलिप्स, प्रोजेक्ट डायरेक्टर जैनम्मा व संस्थेत दाखल असलेले पीडित महिला, पुरुष व अल्पवयीन मुले उपस्थित होती. अशा कठीण प्रसंगी केलेल्या मदतीमुळे त्यांनी पोलिसांचे आभार मानून त्यांना आभाराचे पत्र सुद्धा दिले आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply