Breaking News

बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेने धक्काच बसला होता -शरद पवार

मुंबई ः प्रतिनिधी
आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश इंदिरा गांधींच्या विरोधात होता. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे इंदिरा गांधींसोबत उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाहीत, तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत मी उमेदवारही उभा करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने आम्हाला सगळ्यांना धक्काच बसला होता, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणीबाणीच्या काळातील आठवणी ताज्या केल्या. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पवार म्हणाले, ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या विरोधात अख्खा देश होता, त्या वेळी बाळासाहेब त्यांच्यासोबत उभे राहिले. केवळ उभेच राहिले नाहीत, तर आम्हा लोकांना त्या वेळी धक्काच बसला जेव्हा बाळासाहेबांनी भूमिका घेतली की महाराष्ट्राच्या निवडणुकीला उमेदवारसुद्धा उभा करणार नाही.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाल्यानंतर या तीन पक्षांतील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. काँग्रेसची नाराजी, बदल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस आदी मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष हटावे यासाठी संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत टायमिंग साधून घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Check Also

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत …

Leave a Reply