विद्यार्थ्यांसाठी अँड झँप स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात वित्त व लेखा विभागातर्फे गुरुवारी (दि. 5) अँड झँप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश व्यवसायिक कला, कौशल्ये व व्यवसायाची जाहिरात करणे होता. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील वित्त व लेखा विभागातील सुमारे 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यांच्या अंतर्गत व्यवसायिक कला गुणांचे सादरीकरण केले. या सर्व स्पर्धकांनी उत्तम जाहिरातीचे प्रदर्शन करून प्रगती मिश्रा व मेहेक खान या गटाने प्रथम क्रमांक पटकाविला (एफ. वाय. बी. एस. सी. आय. टी.) तसेच शिवम शर्मा व सुजल रोहीलकर या गटाने द्वितीय क्रमांक पटकाविला (एफ वाय बॅफ) अब्बास मिठाईवाला व अनिकेत वर्मा या गटाने तृतीय क्रमांक पटकाविला (एस वाय बॅफ). प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले व मोलाचे मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. फारुख शेख हे उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन वित्त व लेखा विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रवर शर्मा यांनी केले व प्रा. योगिता पाटील, प्रा. तनुजा सुमन, प्रा. मोसमी लांबे यांनी सहकार्य केले. या स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन, वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे व स्पर्धकांचे कौतुक केले व पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.