पेण ः प्रतिनिधी
रायगड विभागाच्या एसटी कामगार संघटनेच्या संवाद मेळावा पेण येथील महाकाली हॉल येथे उत्साहात झाला. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांच्याबरोबर कर्मचार्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कर्मचार्यांना राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन द्यावे, प्रलंबित आर्थिक मागण्याची पूर्तता तातडीने करण्यात यावी, याबाबतची मागणी या वेळी जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शासनाकडे केली. साडेपाच महिन्याच्या एसटी कर्मचारी संपानंतर चुकीच्या मार्गाने नेतृत्वाने केलेले मार्गदर्शन यामुळे कर्मचार्यांना होणारा त्रास, झालेली फसवणूक यावर संवाद मेळाव्यात चर्चा करण्यात आली, तसेच जास्तीत जास्त सभासद नोंदणीही 2023मध्ये करण्याचा विश्वास या वेळी विलास खोपडे यांनी दिला. धिकारी, सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या वेळी पेण व महाड येथील 45 कामगार संघटनेने नव्याने सामील झाले. विभागीय अध्यक्ष विलास खोपडे, गणेश शेलार वि.भा.सचिव गणेश शेलार, केंद्रीय महिला उपाध्यक्षा आशा घोलप, डी.पी.पवार, खतीब, बी.एम. बांगर, राजेश मोदी, विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.