पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील आणि त्यांचे शेकडो सहकारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशातून शेकापला मोठा झटका बसणार आहे. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात येत्या रविवारी (दि. 13) सकाळी 10 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.