Breaking News

अपघातग्रस्तांसाठी खोपोलीचा आधार; आपत्कालीन स्थितीत मदत बनली चळवळ

खोपोली ः प्रतिनिधी

खोपोली शहर पुणे व मुंबई या दोन महानगरातील मध्यवर्ती शहर आहे. शहराच्या लागून द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, लोकल व मोठी औद्योगिक वसाहत असल्याने या परिसरात सतत वेगवेगळ्या प्रकारचे अपघात, दुर्घटना घडत असतात. या सर्व आपत्कालीन स्थितीत येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय सामाजिक संस्था व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांची मदत कोणत्याही दुर्घटनेत व आपत्कालीन स्थितीत अपघातग्रस्तांसाठी आधार ठरत आहे. द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे महामार्ग असो किंवा येथील औद्योगिक क्षेत्रात रात्री, अपरात्री कोणतीही दुर्घटना किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यावर सर्वात प्रथम मदतीला धावून जाण्याचे काम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आपले कर्तव्य समजून पार पाडत आहेत. यामुळे शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, आरोग्य व्यवस्थेला मोठी मदत होत आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात आणणे, त्यांच्यावर प्रथम उपचार करणे, आवश्यक आरोग्य सुविधापर्यंत रुग्णांना नेणे व अन्य समन्वय साधणे ही सर्व कामे संस्था नियमितपणे पार पाडत आहे. त्यांच्या जोडीला आत्ता शहरातील सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्तेही मदतीसाठी सरसावत असल्याने खोपोलीत आपत्कालीन स्थितीत मदत करणे ही एक चळवळ बनली आहे. यातून अनेकांना मोठा दिलासा मळत असल्याने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय स्तरातून अपघातग्रस्तांच्या कार्याची दखल घेतली जात आहे. कोणत्याही दुर्घटनेनंतर किंवा आपत्कालीन स्थितीत दुर्घटना ग्रस्तांचे नातेवाईकांचा विश्वास व शाबासकीची थाप खोपोलीतील या सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय व पोलीस यंत्रणेवर पडत आहे. यामुळे केलेल्या मदतीचे व सामाजिक कामाचे चीज होत असल्याचे सांगत यातून या पवित्र कार्याला शक्ती प्राप्त होत असल्याचे  अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे मुख्य समन्वयक व देवदूत गुरुनाथ साठेलकर यांनी आवर्जून सांगितले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply