Breaking News

उरणमधील धुतूम गावात घरफोडी; लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार

उरण  : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील  धुतूम गावातील रहिवासी सुभाष मोतीराम ठाकूर यांच्या राहत्या घरी अज्ञात इसमाने घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला  आहे. पोलिस सूत्रांकडून  मिळालेल्या वृत्तानुसार उरण तालुक्यातील  धुतूम गावातील रहिवासी सुभाष मोतीराम ठाकूर हे आपल्या घराला कुलूप लावून जेएनपीए बंदरातील वसाहती मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या मुलीकडे सोमवारी (दि. 9) गेले होते. मंगळवारी (दि. 10) सुभाष ठाकूर हे आपल्या घराकडे आले असता. बंद घराच्या दरवाजाचा कुलूप, कपाट, तिजोरी तोडलेल्या अवस्थेत दिसून आली. तसेच घरातील सामान विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले असता सुभाष ठाकूर यांनी या घटनेची माहिती उरण पोलिसांना दिली. उरण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे सुरू केले असता सुभाष मोतीराम ठाकूर यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत 12 ताळ्याची एक गंठण,5 तोळ्याचे दोन मंगळ सुत्र, 4 अंगठी, 2 कानातील रींग, 50 हजारांची रोकड, 5 तोळे चांदी, टिव्ही संच (एल जी 42) असा लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेने रहिवाशांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उरण पोलीस यंत्रणेने यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सीसीटिव्ही फुटेज चेक करण्यास सुरुवात केली आहे.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply