Breaking News

राज्य बालनाट्य स्पर्धेत रायगडचे कलाकर चमकले

बळी नाटकाला रसिकांची दाद; सहकलाकारांचा सन्मान

पाली : प्रतिनिधी

19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत अम्युचर थिएटर नागोठणे रायगड प्रस्तुत बळी या नाटकातील बालकरांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रायगडच्या झोतिरपाडा बेणसे येथील पायल कुथे व अन्य  बाल कलाकरांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. बळी नाटकाला नाट्यरसिकांनी भरभरून दाद दिली. तसेच अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला. बळी नाटकाच्या लेखक संध्या कुलकर्णी, तर दिग्दर्शन जयंत तारकुंडे, सुखदा तारकुंडे यांनी केले आहे. या स्पर्धेत वाशी नवी मुंबई केंद्रातून शिवरण भूमी प्रतिष्ठान सेवा संस्था मुंबई या नाटकाला प्रथम पारितोषिक तर डी ए व्ही पब्लिक स्कूल नवीन पनवेल संस्थेच्या रेस टू नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले. स्पर्धेत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक प्रशांत निगडे (नाटक-तळमळ एका अडगळीची), द्वितीय पारितोषिक उल्हास रेवडेकर (नाटक-रेस-2 ), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक विनोद राठोड (नाटक-झेप), द्वितीय पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- अदृश्य), नेपथ्य : प्रथम पारितोषिक प्रतिक राक्षे (नाटक-आली मोठी शहाणी), द्वितीय पारितोषिक रमेश पाटील  नाटक-रेस टू), रंगभूषा : प्रथम पारितोषिक अनिल प्रधान (नाटक तळमळ एका अडगळीची), द्वितीय पारितोषिक सचिन वारके (नाटक- रेस टू), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक वरद चासकर (नाटक-रेस टू) व अहिल्या मोरे (नाटक- दप्तर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे पायल कुथे (नाटक-बळी), हिमानी परब  नाटक- उपरी), तनिष्का अपणकर (नाटक-आली मोठी शहाणी), स्वप्नाली शहाणे (नाटक-का भडकले गणपती बाप्पा), कृपा (नाटक- रेस टू), आराध्य पाटील ( नाटक- सुखी सदर्‍याचा शोध ), आर्यन भावर्थे (नाटक- अदृश्य ), प्रियांशु सुतार (नाटक-तळमळ एका अडगळीची) , ऋग्वेद आंबेकर (नाटक- सहा पाय), तेजस चव्हाण (नाटक- माईंड गेम), (नाटक- सहा पाय ), तेजस चव्हाण ( नाटक- माईंड गेम ). 3 ते 07 जानेवारी  या कालावधीत साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत 27 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड, गौरी लोंढे आणि अभय अंजीकर आणि यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply