पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन शैक्षणिक वर्ष 2023-2024 च्या शाळेच्या पहिल्याच दिवशी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-रांजणपाडा शाळेतील मुलांना दप्तर तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप रांजणपाडा गाव भाजप अध्यक्ष दयानंद मोकल यांच्या हस्ते करण्यात आले.
शैक्षणिक साहित्य वाटपच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, एकनाथ घरत, संदेश घरत तसेच गाव अध्यक्ष दयानंद मोकल उपस्थित होते. कार्यक्रमाला एसएमसीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक वर्ग, ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे मोलाचे सहभाग होते.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन दयानंद मोकळ यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. विद्यार्थांसाठी असेच काही तरी नवीन उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात आर्थिक हातभार लावू, असे आपल्या मनोगतामध्ये त्यानी आवर्जून उल्लेख केला. उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.