कार्यकर्त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत प्रवेश
खोपोली, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
खालापूर तालुक्यात महाविकास आघाडीला खिंडार पडले असून चौक जिल्हा परिषद विभागातील टेंभरी ग्रामपंचायतीमधील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 11) प्रवेश केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे चौक भागातील मोठे राजकीय प्रस्थ असणारे सुधीर ठोंबरे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. महाविकास आघाडी हा धक्का सहन करायचे आधी शेकापचे उत्तम भोईर, टेंभरी सरपंच दिलीप ठोंबरे, काँग्रेसचे राजेंद्र जमदाडे, टेंभरी माजी ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली असून येत्या काळात चौक जिल्हा परिषद विभागात महा विकास आघाडीतून आणखी नेते भाजपात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.