Breaking News

नवी मुंबईत हवा प्रदूषणाचा विळखा

रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडथळे
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याच समोर आले आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे दिसून येत असून, रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
या परिसरात राहणार्‍या नागरिकांना श्वसनाचे विकार होण्याची भीती व्यक्त होत असून आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. येथील नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याला गंभीरपणे घेत नसल्याचे दिसून येत आहे, मात्र यावर स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष देत नाही. त्यामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाल्याचे चित्र आहे.नवी मुंबईतील अनेक ठिकाणी एमआयडीसी आहे. त्यामुळे कंपन्या रात्रीच्या अंधारात घातक धूर सोडतात आणि त्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना मरणयातना सहन करून जगावे लागत आहे.
वेळीच यावर उपाययोजना न केल्यास याचे परिणाम भयंकर होणार असल्याचे दिसून येत आहे. भयंकर प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या नवी मुंबईची रात्रीची दृश्य समोर येत आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply