Friday , September 29 2023
Breaking News

क्रिकेट स्पर्धेत पेण फोटोग्राफर असोसिएशन संघ विजेता

रोहा : प्रतिनिधी
रोहा, कोलाड, चणेरा पत्रकार असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन धाटाव येथील तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पेण फोटोग्राफर असोसिएशनने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला होता. द्वितीय क्रमांक रोहा फोटोग्राफर, तृतीय क्रमांक पोयनाड फोटोग्राफर, तर चतुर्थ क्रमांक कर्जत फोटोग्राफर या संघांनी प्राप्त केला. स्पर्धेत मालिकावीर शैलेश म्हात्रे (पेण), उत्कृष्ट फलंदाज परेश खांडेकर (रोहा), उत्कृष्ट गोलंदाज (पोयनाड) यांनी चकमदार कामगिरी केली. विजेते संघ व वैयक्तिक दमदार प्रदर्शन करणार्‍या खेळाडूंना गौरविण्यात आले. या वेळी रायगड फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष विवेक सुभेकर व अन्य उपस्थित होते.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply