Breaking News

अलिबाग पात्रूदेवी मंदिरात चोरी करणारा 24 तासांत गजाआड

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड येथील पात्रुदेवीची मूर्ती चोरून नेणार्‍या चोरट्याला अलिबाग पोलिसांनी 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. अहमदनगर येथे जाऊन त्याला अटक करण्यात आली.
एका चोरट्याने 11 ते 12 जानेवारीदरम्यान रात्रीच्या वेळेस पेण-अलिबाग मार्गावरील कार्लेखिंड येथील मंदिराचे कुलूप तोडून पात्रूदेवीची मूर्ती व इतर सात हजार 800 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. या घटनेनंतर अलिबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 48 तासांतच चोरटयाला अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. दिलीप घोडके असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरी केलेल्या पात्रुदेवीसह अन्य दोन मुर्त्या, दानपेटी, घंटा, तलवार आदी सर्वच मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply