Breaking News

जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी व्हा

अरुणशेठ भगत यांचे प्रतिपादन

गव्हाण ः रामप्रहर वृत्त

येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये इ. 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेबरोबरच जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा अरुणशेठ भगत यांनी अध्यक्षपदावरून बोलताना दिल्या.

प्रमुख वक्त्या नम्रता न्यूटन यांनी विविध उदाहरणांसह परीक्षेची तयारी करण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य उत्तमराव गायकवाड यांनी केले. स्थानिक शाळा समितीचे सदस्य विश्वनाथ कोळी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी स्वयंम कोळी, सुशांत चौगुले व कु. शिवानी काबुगडे या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षक प्रतिनिधी संदीप भोईर यांचे या वेळी समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर रंधवे यांनी केले, तर संस्थेचे लाईफ  वर्कर प्रमोद कोळी यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी सरपंच हेमलता भगत, माजी सरपंच जिज्ञासा कोळी, ग्रा. पं. सदस्य कामिनी कोळी, देशमुख, अ‍ॅड रूपेश म्हात्रे, राजेंद्र देशमुख, अमर म्हात्रे, मदन पाटील, उपमुख्याध्यापक पी. एम. शेख, पर्यवेक्षक अरुण घाग सर, गुरुकुल प्रमुख रवींद्र भोईर, 10वीचे वर्गशिक्षक प्रदीप काकडे, सी. एम. पाटील आदी मान्यवर तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी प्रमोद कोळी व अरुण घाग यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ  वर्करपदी निवड झाल्याबद्दल चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते  त्यांचा सत्कार करण्यात आला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply