पेण : प्रतिपादन : आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी दैनंदिन जीवनात सूर्यनमस्कार व योगासने आवश्यक असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी येथे केले.
पेण नगर परिषदेच्या वतीने महिला व बालकल्याण समिती सभापती तेजस्विनी नेने यांच्या पुढाकाराने डॉ. भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली इनडोअर हॉल येथे महिलांसाठी सूर्यनमस्कार व योगासने विषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील बोलत होत्या. सहज व सुलभ योगासने व सूर्यनमस्कार करून महिलांना आपले आरोग्य सुद़ृढ ठेवता येईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पेण नगर परिषदेच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल तेजस्विनी नेने यांनी त्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ. रजनी सूर्यवंशी, डॉ. अर्चना सुर्वे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी जोशी व अंजली म्हात्रे यांनी केले. यावेळी पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना, मुख्याधिकारी अर्चना दिवे, डॉ. अशोक भोईर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरत निंबरे, अंकिता इसळ, वृंदा नाजरे, शिवानी नागटे, मेघा जोशी, विशाखा पवार यांनी विषेश परिश्रम घेतले.