Breaking News

उरणच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना पागोटेत अभिवादन

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
सन 1984मध्ये उरण तालुक्यात झालेल्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना मंगळवारी (दि. 17) भाजपचे रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पागोटे येथे अभिवादन केले. या वेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली तसेच हुतात्मा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.
शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यात प्रखर लढा उभारण्यात आला होता. या लढ्यात जासई येथे 16 जानेवारी 1984 रोजी नामदेव शंकर घरत (चिर्ले) आणि रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम) हे पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झाले, तर दुसर्‍या दिवशी नवघर फाट्यावर जमलेल्या शेतकर्‍यांवरही गोळीबार करण्यात आला. यात पागोटे येथील कमलाकर कृष्णा तांडेल, महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील यांना हौतात्म्य आले. या लढ्याचा स्मृतिदिन दरवर्षी होत असतो.
हुतात्म्यांच्या 39व्या स्मृतिदिन कार्यक्रमास 1984 सालच्या आंदोलनातील रणरागिणी भारती पोवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, वहाळ साई संस्थानचे रविशेठ पाटील, चंद्रकांत घरत, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील, पागोटेचे अध्यक्ष आशिष तांडेल, सरपंच कृणाल पाटील, जे. डी. तांडेल, मेघनाथ तांडेल, प्रशांत पाटील, सीमा घरत यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी हुतात्म्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच ज्या ठिकाणी तिघे हुतात्मे झाले होते त्या रेल्वे रूळाजवळ मानवंदना देण्यात आली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply