Breaking News

नवी मुंबई फेस्टमधून एकात्मतेचा संदेश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वर्ल्ड कल्चरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे नवी मुंबई फेस्ट 2023या सामाजिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 21 जानेवारीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून 29 जानेवारीपर्यंत हा फेस्ट झाला. या फेस्ट ला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 29) सदिच्छा भेट दिली. यादरम्यान नवी मुंबईतील सिवूडस मॉलमध्ये तीन दिवस देशातील राज्यांच्या सांस्कृती, कला, परंपरा तसेच खाद्य संस्कृतीची मेजवानी होती. या नवी मुंबई फेस्टमधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जात असून सहभागी राज्यांच्या संस्कृती, कला, परंपरेची नवी मुंबईकरांना दर्शन घडविण्यात येत आहे, असे कौतुक या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
नवी मुंबई फेस्ट हा गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आला असून खेळ, सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यामध्ये जल्लोषात पारंपारिक सांस्कृतिक मूल्यांचे आधुनिक जगासोबत एकीकरणाचा संदेश दिला. या उत्सवात महाराष्ट्र, ओडिशा, केरळ, कर्नाटक, गुजरात, यूपी, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश इत्यादी सहभागी राज्यांसह त्यांची संस्कृती, नृत्य, फॅशन, खाद्य, क्रीडा, कला, साहित्य आणि टॉक शो प्रदर्शित केले. शुक्रवारी याची सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्राने नेतृत्व केले आहे. पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र गाथा याने सुरुवात करण्यात आली. यामध्ये राज्यातील संतांची परंपरा, दिंडी सोहळा, बळीराजा संस्कृती, वासुदेव, मराठी संगीत-नृत्य संस्कृतीचे दर्शन घडविले. वर्ल्ड कल्चरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या या महोत्सवाच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. या वेळी उपस्थित बेलापूर आमदार मंदा म्हात्रे यांनी हा आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महोत्सवात विविध राज्यातील परंपरा, संस्कृती दाखविण्यात आली. यातुन पुढच्या पिढीला भारत देशाच्या राष्ट्रीय एकात्मता आणि त्या-त्या राज्याच्या सांस्कृतिविषयी माहिती दिली जात आहे, हे अभिमानास्पद आहे. यापुढे ही नवी मुंबई शहरात असे राष्ट्रीय एकात्मता दर्शन घडविणारे कार्यक्रम झाले पाहिजेत, असे सांगितले.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply