नवी मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 2) सकाळी नेरूळ सेक्टर 24मधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे. या मतमोजणीसाठी आगरी-कोळी सांस्कृतिक भवनसमोरील रोडवर दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग करून मतमोजणीच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंदी करण्यात आली असल्याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाने जारी केली आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी शांततेत पार पडल्यानंतर या निवडणुकीच्या मतपेट्या नेरूळ सेक्टर 24मधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते निकाल पाहण्यासाठी येणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, तसेच या मार्गावर वाहनांस प्रवेश बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आली आहे.
Check Also
उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …