नवी मुंबई : बातमीदार
रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना वाहतूक व्यवस्था जाणे-येणे सोईस्कर होण्यासाठी 15 जूनपासून लोकलसेवा सुरू केली आहे. मात्र यातून टपाल व बँक कर्मचार्यांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत मोडणार्या टपाल व बँक कर्मचार्यांना रेल्वेत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी टपाल कामगार सेनेचे सरचिटणीस व स्थानीय लोकाधिकार महासंघाचे अजय माने यांनी केली आहे. बँक व टपाल कर्मचारी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनसेवा करून आपले योगदान देत आहेत. अनेकजण क्वारंटाइन तर काही होम क्वारंटाइन आहेत.असे असताना त्यांना लोकल सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. हे अन्यायकारक असून राज्यशासनाने शिफारस केलेल्या रेल्वे आसथापनेस टपाल व बँक कर्मचार्यांना लोकल सेवेचा लाभ मिळण्याची गरज आहे.