पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण विभागातील एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महेंद्र घरत, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, हेमलता भगत, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, निर्गुण कवळे, रघुनाथ देशमुख, साईचरण म्हात्रे, जयवंत देशमुख, अनिल देशमुख, कमलाकर देशमुख, श्रीकांत घरत, रघुनाथशेठ घरत, योगिता भगत, मीनक्षीताई पाटील, जयश्री कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन आदी मान्यवरांनी ध्वजारोहण करीत मानवंदना दिली. या वेळी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
पनवेल ः तालुक्यातील दिघाटी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. दिघाटीचे सरपंच अमित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपसरपंच रोहिदास शेडगे, केळवणे पं. समिती विभागीय अध्यक्ष हिरामण ठाकूर, उपसरपंच दत्तात्रय पाटील, ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, प्रमोद पाटील, बळीराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, स्मिता ठाकूर, वैशाली पाटील, अक्षता म्हात्रे, हर्षदा पाटील, केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, ग्रामसेवक, शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल ः जांभिवली येथे 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जांभिवली गावच्या सरपंच रिया कोंडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका, पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.