पाली : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चिंचवली येथील तरुण आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या बागेतून पहिली हापूस आंब्याची पेटी वाशी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली आहे.
फळांचा राजा म्हणून हापूस ओळखला जातो. कोकणातील हापूसची चव जगभरातील खवय्यांना वेड लावते. मार्च, एप्रिल, मे महिन्यात उत्पादित होणारा हापूस आंबा जानेवारी महिन्यात उपलब्ध झाला असून मार्केटमध्ये चांगला दर मिळवून देणार असल्याने वरूण पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. वरुण पाटील यांची एकूण आंबा बाग 50 एकर क्षेत्रावर आहे. रोहा, अलिबाग, पेण या ठिकाणी बागायती असून मोठ्या कष्टाने या बागा फुलविण्याचे काम वरुण पाटील करीत आहेत. वरुण हे पूर्णवेळ शेती व्यवसाय करतात. तरुणांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून न पाहता करियर म्हणून पाहावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची किमया शेतीमध्ये आहे. शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेऊन आपण स्थिरस्थावर होऊ शकते. शेतीचे मोल जाणून शेती करण्यावर अधिकाधिक भर देणे गरजेचे आहे, असे तरुण आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी सांगितले.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper