Breaking News

भाजपच्या हळदी कुंकूला महिलांची अलोट गर्दी

पेणच्या मा. नगराध्यक्ष प्रितम पाटील यांचे मानले आभार

पेण : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष पेण व नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठ निवासाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या हळदीकुंकू समारंभाला जवळ जवळ 3 ते 4 हजार महिलांची उपस्थिती लाभली.  या हळदीकुंकू समारंभाचे उदघाट्न माजी जि. प. सदस्या कौसल्याताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्षा गीता पालरेचा यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी मा. उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मा. नगरसेविका देवता साकोस्कर, शहेनाज मुजावर, नलिनी पवार, धनश्री समेळ, भाजप शहर अध्यक्षा सुप्रिया चव्हाण, अंकिता पोटे, शर्मिला पाटील, सुषमा पाटील, प्रतिभा पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सर्व महापुरुषांना अभिवादन करीत स्त्रियांना आपले हक्क व न्याय मिळवून देणार्‍या थोर व्यक्ती व समाजसुधारक यांनी कशाप्रकारे योगदान दिले याची माहिती दिली. शेतीच्या बांधापासून ते देशाच्या सीमेपर्यंत रक्षण करणार्‍या स्त्रिया असून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात पुरुषांबरोबर महिलाही अग्रस्थानी आहेत, असे त्यांनी सांगितले.  आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले कि, या हळदीकुंकू समारंभाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करण्याचे काम प्रितम पाटील यांनी केले असून त्यांच्या कलागुणांना एक प्रकारे वाव देण्याचे काम केले आहे. सर्वानी एकत्रित राहून, एकसंघी राहूनच आनंद साजरा करता येतो. आपल्या आशिर्वादाने पुन्हा आमदार झालो असून या पेणच्या विकासाला चालना देण्याचे काम आपल्यामुळेच शक्य होत आहे, पेणमधील साई मंदिर, स्मशानभूमी कामे होणार असून यापुढेही कामे होणार आहेत. आपले प्रेम अबाधित ठेवा हीच भावना आहे, असे शेवटी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले. यावेळी होमिनिस्टर भाऊजी नितीन गवळी यांनी महिलांच्या विविध स्पर्धा घेत आपल्या वकृत्व शैलीने कार्यक्रमात रंगत आणली. अनेक महिलांनी विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे जिंकली व कार्यक्रमच मनमुराद आनंद घेतला. यावेळी लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आलेल्या अनेक विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी वाटप करण्यात आल्या. मा. नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी हळदीकुंकूच्या माध्यमातून महिलांच्या मनोरंजनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक महिलांनी यावेळी त्यांचे आभार मानले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप महिला कार्यकर्त्यांबरोबर पुरुष कार्यकर्त्यांनीही विशेष मेहनत घेतली. शेवटी मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

शहर विकासासाठी प्रयत्नशील : प्रितम पाटील

गेली 9 वर्षे नगराध्यक्षा म्हणून हळदीकुंकू कार्यक्रम करीत असताना लोकांच्या मनात स्थान निर्माण केले असून यामुळेच आज हजारो महिलांची उपस्थिती लाभली आहे. पेणकरांशी आपुलकीची, प्रेमाची, स्नेहाची नाळ जुळली आहे. गेल्या 9 वर्षात नगराध्यक्षा म्हणून काम करीत असताना पेण म्हणजे आपले कुटुंब म्हणूनच काम केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  तसेच गटनेते अनिरुद्ध पाटील व सहकारी नगरसेवक यांच्या सहकार्याने शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम वेळोवेळी केले असून यामुळे कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आणले आहेत. यापुढेही आपले शहर सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात पेण शहर मागे राहू नये या दृष्टिकोनातून शहराचा विकास यापुढेही करणार यासाठी आपले आशीर्वाद गरजेचे असल्याचे प्रितम पाटील यांनी सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply