Breaking News

तायक्वांदो स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे यश

खारघर ः रामप्रहर वृत्त

राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद पालघर यांच्या वतीने मुंबई विभागस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन विरार येथील नवीन विवा कॉलेज या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर ओवे पेठ येथील रामशेठ ठाकूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून उज्वल यश संपादन केले आहे. कोकण विभागातील सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये रामशेठ ठाकूर विद्यालयातील विद्यार्थी जयेश प्रवीण सोनावणे याने मुलांच्या 17 वर्षाखालील गटात तृतीय क्रमांक पटकाविला. त्यास जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा व युवक सेवा संचलनालय उपसंचालक यांच्या हस्ते प्राविण्य प्रमाणपत्र व कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राचार्य निशा नायर, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील व माध्यमिक विभागाचे संभाजी जाधव यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, प्राचार्य निशा नायर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी जयेश सोनावणेचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply