पनवेल ः वार्ताहर
परिणिता सोशल फाउंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांचे गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन पनवेल शहरात प्रथमच गोखले हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) झाले.
उद्घाटन समारंभास नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, परिणीता सोशल फाउंडेशनचे संस्थापक प्रशांत सागवेकर, साक्षी सागवेकर, महाराष्ट्र कोअर टीम लीडर नंदिनी पंडित, स्मिता जोशी, लायन्स क्लब पनवेल अध्यक्ष हेमंतसिंग ठाकूर, सुयोग पेंडसे, सुरभी पेंडसे, सामजिक कार्यकर्ते सुहासिनी केकाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की, परिणिता फाउंडेशने आयोजित केलेले हे सर्वसमावेश अशा प्रकारचे प्रदर्शन आहे. या माध्यमातून महिला उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आगामी काळातही त्यांनी असेच उपक्रम राबवून महिलांना प्रोत्साहन द्यावे.
महिला भगिनींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन परिणीता सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर यांनी केले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …