Breaking News

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान खारघरमध्ये उत्साहात

मान्यवरांच्या उपस्थितीत पाच लाखांची देणगी

खारघर : रामप्रहर वृत्त

अयोध्येमध्ये उभारण्यात येणार्‍या भव्य श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने पनवेल परिसरातील खारघरमध्ये श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमामध्ये व्हीएचपीचे प्रांतसह मंत्री दादा देसाई यांनी प्रस्तावना सादर केली, तर क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी समाजाला राम मंदिरासाठी निधी दान करण्याचे आवाहन केले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आरएसएसचे पनवेल शहर सरसंचालक प्रशांत कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये एकूण पाच लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला.

या वेळी न्याति संप्रदायाच्या पदाधिकार्‍यांसह  विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री लालजी भाई, खारघर नगरचेमंत्री विजन कन्वर, सभापती अनिता पाटील, भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष बिना गोगरी, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, नगरसेवक अभिमन्यु पाटील, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, दिलीप जाधव, आरएएसएसचे नगरकार्यवाह, अरविंद थपलू, शिवम सिंग, ज्ञानेश्वर खरपुरीया, भावेश अंकुरिया, भोलाकुमार सोनार, संजय केसरवाणी, रंजन शर्मा, स्वरुप प्रभुणे, मनोज भारद्वाज, मनोज मंगेरा, ललित चौधरी, जयेश गोगरी, अजितकुमार नायर, प्रकाश मोरबेकर आदी उपस्थित होते.

Check Also

पर्यावरण असंतुलनामुळे द्रोणागिरी डोंगराला धोका

संरक्षणासाठी ठोस पावले उचला; आमदार महेश बालदी यांची ‌‘लक्षवेधी‌’ पनवेल : रामप्रहर वृत्तउरणमधील ऐतिहासिक आणि …

Leave a Reply