Breaking News

खारघरमध्ये भाजपच्या बदनामीचा घाट

पदाधिकारी आक्रमक

खारघर : रामप्रहर वृत्त
खारघरच्या माजी नगरसेवकांवर हफ्तेखोरीचा आरोप करणारी बातमी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात शनिवारी (दि. 11) प्रसिद्ध झाली होती. असे कृत्य जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वनियोजित कटानुसार केले आहे, असा आरोप भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केला आहे.
सचिन इंगळे हा खारघरच्या फुटपाथवर अनेक ठिकाणी वेगवेगळे धंदे लावण्याकरिता जागा उपलब्ध करून देतो. खारघर सेक्टर 8 येथे एक व हिरानंदानी समोर दोन तसेच खारघर सेक्टर 7 येथील बँक ऑफ इंडियाचा चौक येथे एक असे वेगवेगळे धंदा करणारे हाताशी धरून प्रत्येकाकडून 15 ते 20 हजार रुपये हप्ते गोळा करतो तसेच तो पोलिसांचा टिप्पर असल्याने व खारघरमधील माजी नगरसेविका लीना अर्जुन गरड यांचे पती पोलीस अधिकारी अर्जुन गरड यांचा त्याच्यावर वरदहस्त असल्याची खारघरमध्ये चर्चा आहे, असे ब्रिजेश पटेल, दीपक शिंदे यांनी सांगितले. सचिन इंगळे हा सर्रासपणे हप्तेखोरी करीत आहे. या विरोधात खारघर भाजप सरचिटणीस कीर्ती नवघरे व भाजप युवा मोर्चाचे अमर उपाध्याय यांनी महापालिकेत वारंवार या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. हे पत्र पाहिले तर अवैध धंद्याचा सुळसुळाट खारघरमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणूनच यावर भाजप वारंवार आवाज उठवत असल्याने याचा पोटशूळ विरोधकांना उठला आणि त्यांच्याकडून हस्तक सचिन इंगळे याला पुढे करीत भाजप खारघर आणि पदाधिकारी, नगरसेवकांची नाहक बदनामी केली जात आहे, मात्र भाजप खारघर अशा कट-कारस्थानांना घाबरत नाही आणि भाजप खारघर या विरोधात कायम आवाज उठवत आला आहे आणि आवाज उठवत राहणार. ज्या टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकांमध्ये एकतर्फी बातमी लावण्यात किंवा प्रसिद्ध करण्यात आली आहे. वस्तुस्थिती पाहिली तर भाजप पदाधिकारी अमर उपाध्याय यांनी सुरुवातीला याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार तसेच दाद
मागितली होती. यानंतर एक व्हिडिओ स्वतः सचिन इंगळे याने चालाखीने भाजप पदाधिकारी अमर उपाध्याय यांच्या नावाचा उल्लेख करीत ते हप्ता घेत असल्याचे उघड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न फसला आहे, कारण पूर्ण व्हिडीओ पाहिला असता काम करणार्‍या तरुणांनी अमर उपाध्याय यांच्या नावाचा कुठलाही उल्लेख केलेला नाही, मात्र जाणीवपूर्वक अमर उपाध्यायचे नाव घे असे बोलल्याचा व्हिडीओमध्ये स्पष्ट आवाज येत आहे. अशाच प्रकारे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अक्षय लोखंडे यालासुद्धा गोवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकाचा पत्रकार निव्वळ पोलीस अधिकारी अर्जुन गरड यांच्या दबावाखाली एकतर्फी बातमी प्रसिद्ध करीत आहे याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो, असे भाजपचे ब्रिजेश पटेल व दीपक शिंदे यांनी म्हटले आहे.
टाइम्स ऑफ इंडिया हे दैनिक निवळ प्रामाणिक पत्रकारिता करते असा आमचा समज होता, मात्र अशी एकतर्फी बातमी प्रसिद्ध करून या दैनिकाने विश्वासहर्ता
गमावली आहे, असेही भाजपचे पटेल व शिंदे यांनी खेदाने म्हटले आहे.

अमर उपाध्याय यांनी केली पोलखोल
या संदर्भात भाजपचे अमर उपाध्याय यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, नागरिकांना उत्तम सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही पदाधिकारी कार्यरत असतो. रस्त्यांवर होणार्‍या अतिक्रमणाच्या आम्ही नेहमी विरोधात असतो. यातून नागरिकांचे हितच साधतो. आम्ही फूटपाथवरील अतिक्रमणाबाबत पनवेल मनपाला निवेदनही दिले होते. त्यानंतर या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली. यातील सचिन इंगळे या फेरीवाल्याने विरोधी पक्षातील लोकांच्या सांगण्यावरून भाजप पदाधिकार्‍यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपाध्याय यांनी इंगळेसोबत काम करणार्‍या तरुणाला पत्रकारांसमोर आणून संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केली.

Check Also

सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत चाहूशेठ …

Leave a Reply