Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते 250 बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेच्या (दिव्यांगजन) खारघर केंद्रात शनिवारी (दि. 17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने 250 बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे (किट) वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72वा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशभर साजरा होत आहे. याचे औचित्य साधून सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचे डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली देशात 72 ठिकाणी सामाजिक अधिकारिता शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी या सर्व शिबिरांमध्ये ऑनलाइन उपस्थित होते.
खारघर येथे झालेल्या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आयुष मंत्रालय मुंबई होमिओपॅथी अनुसंधान प्रभारी अधिकारी डॉ. रमेश बावसकर, अली यावर जंग राष्ट्रीय वाक्-श्रवण दिव्यांगजन संस्थेच्या विशेष शिक्षण व्याख्याता डॉ. गायत्री अहुजा, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेच्या नवी मुंबई केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंग यांच्यासह भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, माजी नगरसेवक रामजी बेरा, सामाजिक कार्यकर्ता गिरीश गुप्ता, उत्तर भारतीय सेल सहसंयोजक शैलेंद्र त्रिपाठी, बौद्धिक दिव्यांग जन मुले, त्यांचे  पालक, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते 250 बौद्धिक दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे (किट) वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply