लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पाठपुरावा; तहसील कार्यालयामार्फत शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त
जेएनपीटी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 1630 मच्छीमार लाभार्थ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकसानभरपाई मिळणार आहे. या लाभार्थ्यांची कागदपत्रे आणि बँक खात्याचा तपशील घेण्याकरिता शुक्रवारी (दि. 10) उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तहसील कार्यालयामार्फत लाभार्थी नुकसानभरपाई संकलन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जेएनपीटी प्रकल्पामुळे अनेक मच्छीमार बांधव प्रकल्पग्रस्त झाले आहेत. या प्रकल्पग्रस्तांचा नुकसानभरपाईचा प्रश्न लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला असून 1630 प्रकल्पग्रस्तांचा नुकसानभरपाई मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वेक्षण यादीतील 1630 लाभार्थ्यांना नुकसानभरपाईपोटी रकमेचे वाटप करण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांची ओळख दर्शवणारी कागदपत्रे संकलित तसेच बँक खात्याचा तपशील जमा करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रयत्नाने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयामार्फत लाभार्थी नुकसानभरपाई संकलन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या शिबिरावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, चेअरमन चंद्रकांत कोळी, कोळी समाजाचे माजी अध्यक्ष सुनील कोळी, अध्यक्ष विश्वनाथ कोळी, मोतीलाल कोळी, राजकिरण कोळी, पी. ए. कोळी, सागर ठाकूर, सी. एल. ठाकूर, सी. सी. भोईर, सुधीर ठाकूर, नंदा कोळी, विशाल कोळी, संजीव कोळी, के. डी. कोळी, किशोर कोळी यांच्यासह पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
या वेळी ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते नाही अशांसाठी तसेच कागपत्रांची पूर्तता करण्याकरिता विषेश कक्ष उभारण्यात आला होता. या वेळी मोबदल्याची रक्कम मिळण्याकरिता लाभार्थ्यांचे बँक खाते तपशील, ओळख दर्शविणारी कागदपत्रे संकलित करण्यात आली. ज्या लाभार्थ्यांनी तपशीलाची पूर्तता या शिबिरात केली, त्यांना येत्या आठ दिवसांमध्ये नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, मच्छीमार बांधवांचा नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कोळी समाजाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले आहेत.