Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 10) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठातील अकाउंट व फायनान्स ऑफिसर डॉ. प्रदीप कामटेकर उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवालाचे वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवालाचे प्रकाशन, तसेच विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे तसेच भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे स्थानिक कमिटी सदस्य प्रभाकर जोशी, दीपक शिंदे, तसेच डॉ. तपासे, सचिन पाटील, शुभ पाटील, संदीप रेड्डी, एस. आर. पाटील, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. के. पाटील, प्रा. डॉ. बी. डी. आघाव, प्रा. सूर्यकांत परकाळे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर आदी उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळी नृत्ये तसेच गीते सादर केली. सूत्रसंचालन प्रा. नम्रता पारीक व प्रा. सफीना मुकादम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. मीनल मांडवे यांनी मानले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply