Breaking News

माणगावमध्ये सह्याद्री मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • लक्ष्मण दरवाडा, गायत्री पाटील अव्वल
  • ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षेची खास उपस्थिती
    माणगाव ः प्रतिनिधी
    टीडब्लूजे (ट्रेड विथ जाझ) आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) सह्याद्री मॅरेथॉन 2023चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता शिवराज राक्षे याची उपस्थिती खास आकर्षण ठरली. स्पर्धेत खुल्या गटात पुरुषांमध्ये लक्ष्मण दरवाडा (खोपोली), तर महिलांमध्ये गायत्री पाटील (रसायनी) हिने बाजी मारली. ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे याच्या हस्ते दीप प्रज्वलन केले, तर ‘टीडब्ल्यूजे’चे मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ‘टीडब्ल्यूजे’चे माणगाव शाखा व्यवस्थापक मुनाफ मुकादम यांनी ही स्पर्धा आरोग्य, व्यायाम, क्रीडाप्रकार याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, व्यायामाचे महत्त्व नागरिकांना समजावे यासाठी आयोजित केल्याचे सांगितले. स्पर्धेत सात गट तयार करण्यात आले होते. 14 वर्षापर्यंत मुला-मुलींना तीन किलोमीटर अंतर, 17 वर्षापर्यंत मुला-मुलींना पाच किलोमीटर, महिला व पुरुष खुला गट 10 किलोमीटर आणि 45 वर्षांपेक्षा अधिक असणार्‍या व्यक्तींसाठी ड्रीम रन दोन किलोमीटर अशी विभागणी करण्यात आली होती गटात पहिल्या सहा येणार्‍या विजेत्यांना रोख बक्षीसासह सन्मानपदक व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभागी होणार्‍या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात आले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply