पनवेल ः रामप्रहर वृत्त
पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश खोडाडे हिने द्वितीय पारतोषिक पटकाविले. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.
राष्ट्रीय अॅबेकस स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश खोडाडे हिने 100 गणितांपैकी 98 गणिते पाच मिनीटे आठ सेकंदात सोडविली. या स्पर्धेत 800 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात अन्वी खोडाडे हिने द्वितीय पारितोषिक पटकावले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या इन्चार्ज प्रिन्सिपल रंजिषा प्रशांत, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे पीआरओ बाळासाहेब कारंडे, संस्थेच्या रायगड विभागाचे हेड क्लार्क गुजर, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, तिचे पालक उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …