Breaking News

दुर्गम भागात दिवाळीनिमित्त फराळ आणि फटाक्यांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाचे संकट पूर्णपणे अजून गेले नसले तरी नियमांचे पालन करून नागरिकांनी यावर्षी दिवाळी साजरी केली. अनेक ठिकाणी दिवाळी जल्लोषात साजरी होत असली तरी पनवेलमधील काही दुर्गम भागात दिवाळी साजरी करता आली नाही. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गरिबांचीदेखील दिवाळी साजरी व्हावी. या उद्देशाने पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार दिवाळीनिमित्त दुर्गम भागातील बांधवाना आणि चिमुकल्यांना दिवाळी फराळ व फटाक्यांचे वाटप करण्यात आले.

या वेळी लहान मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद वेगळाच होता त्यांनी फटाके आणि फराळाचा आस्वाद घेत दिवाळी साजरी केली. या उपक्रमाच्या वेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष तथा विहान ग्रुपचे मालक केवल महाडिक, पत्रकार संतोष आमले, कैलास रक्ताटे, रोहन सिनारे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply