Breaking News

व्हेल माशाची 18 कोटींची उलटी जप्त

सांगली : प्रतिनिधी
व्हेल माशाची उलटीची (अंब्ररग्रिस) तस्करी करणार्‍या मुख्य सूत्रधाराला सांगली पोलिसांनी अटक करून, 18 कोटी 60 हजार मूल्याची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. मुख्य संशयितास पुढील तपासासाठी सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने मंजूर केला आहे.
याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार दिवसांपूर्वी व्हेल माशाची उलटी तस्करी करणार्‍या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्य सूत्रधार निलेश रेवंडकर (वय 42 रा. तळाशील ता. मालवण, जि.सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 18 किलो 600 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी हस्तगत करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे मूल्य 18 कोटी 60 लाख रुपये आहे. मूख्य सूत्रधार रेवंडकर याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता सहा दिवस म्हणजे, 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
*फोटो व्हेल उलटी

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply