Breaking News

शिवजयंतीनिमित्त पनवेलमध्ये निघणार भव्य दिव्य मिरवणूक

सहभागी होण्याचे महापालिकेच्या नियोजन बैठकीमध्ये आवाहन
पनवेल : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने लोकसहभागातून महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात येणार्‍या पनवेल शहरामधील मिरवणूकीची नियोजन बैठक सोमवारी (दि. 13) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. यावर्षी महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याचे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले. या मिरवणूकीमध्ये विविध शाळांनी, संस्थानी सहभागी होण्याचे व आपल्या सहभागाची पूर्व नोंदणी महापालिकेकडे करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या वेळी उपायुक्त कैलास गावडे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महापालिका अधिकारी व कर्मचारी, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, विविध जयंती मंडळाचे प्रतिनिधी, विविध शाळांचे प्रतिनिधी, विविध शासकीय संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.गेली दोन वर्षे कोरोनाकाळ असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पनवेल शहरात महापालिकेच्या माध्यमातून निघणारी मिरवणूक काढण्यात आली नव्हती, मात्र यावर्षी महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याचे नियोजन आजच्या बैठकित करण्यात आले. यानिमित्ताने लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक यांची स्पर्धा होणार आहे. या मिरवणूकीमध्ये विविध शाळांनी, संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले असून आपल्या सहभागाची पूर्व नोंदणी महापालिकेकडे करणे गरजेचे असल्याचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी या
वेळी सांगितले. मिरवणुकीची सुरूवात सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होईल आणि मिरवणूकीचा शेवट टपाल नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळा चौकामध्ये होईल. याठिकाणी मिरवणूकीमध्ये सहभागी स्पर्धकांमधून विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करून त्यांना सन्मानित करण्यात येईल. याचबरोबर महापालिका हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवासाठी महापालिकेच्या वतीने परवानगी देणे तसेच या अनुषंगाने येणार्‍या इतर विषयांवरती या वेळी चर्चा करण्यात आली. लोकसहभाग व प्रायोजकांमार्फत होणार उत्सवाचा खर्च
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा खर्च लोकसहभागतून व प्रायोजकांच्या मार्फत केला जाणार आहे. नागरिकांनी, प्रायोजकांनी देणगी देण्यासाठी महापालिकेचे अधिकारी प्रकाश गायकवाड (7506131045) आणि हरेश गायकवाड (9820249019) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply