Breaking News

महिला दिनी मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर शाळेत बलात्कार

महाबळेश्वरमधील धक्कादायक घटना

महाबळेश्वर ः प्रतिनिधी
महिला दिनीच महाबळेश्वरमधील एका मुख्याध्यापकाने दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. नराधम शिक्षकावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने केलेल्या कुकर्माने महाबळेश्वरसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दिलीप रामचंद्र ढेबे (वय 50, रा. मेटगुताड, ता. महाबळेश्वर) असे नराधम मुख्याध्यापकाचे नाव आहे. त्याने आपल्याच शाळेत दहावी इयत्तेत शिकत असलेल्या जवळच्या नात्यातील 15 वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोगशाळेत व हॉलमध्ये वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला.
याबाबत एका जागरूक नागरिकाने चाइल्ड हेल्पलाइन 1098 क्रमांकावर तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत चौकशीसाठी तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. पीडित मुलीला पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. मुख्याध्यापकाने पोलिसांजवळ आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असून, त्याच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या बलात्कार प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply