Breaking News

फूडलँन्ड कंपनीजवळील उड्डाणपूलाच्या काँक्रीटीकरण कामाबद्दल सिडकोचे आभार

पनवेल : वार्ताहर
सिडको तर्फे कळंबोली ते तळोजा एमआयडीसी यांना जोडणार्‍या फूडलँन्ड कंपनीजवळील उड्डाणपूलाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तळोजा एमआयडीसीमधील उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पुलाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू केल्याबद्दल तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने सिडकोचे आभार मानले आहे. कळंबोली ते तळोजा एमआयडीसी यांना जोडणार्‍या फूडलँन्ड कंपनीजवळील उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यामुळे तळोजा एमआयडीसीमधून निघणार्‍या अवजड वाहनांना याचा नाहक त्रास होत होता. त्यामुळे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने सिडकोकडे या उड्डाणपुलावरील काँक्रिटीकरणाबाबत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून सिडकोतर्फे आजपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याबद्दल तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने सिडकोचे आभार मानले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply