Breaking News

शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त

शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल तालुक्यातील टावरवाडी व सतिचीवाडी येथील कार्यकर्त्यांनी समर्थकांसह शनिवारी (दि. 4) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. हौशाचीवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, तसेच राजेश भोईर, सरपंच हर्षदा चौधरी, काळूराम वाघ, जनार्दन निरगुडा, जोमा निरगुडा, विकास भगत, गणेश शीद, राघो भस्मा, कमळू चौधरी, किसन चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी टावरवाडी येथील लक्ष्मण ठाकरे, जनी ठाकरे, सतिचीवाडी येथील रामा दोरे या शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply