पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांनी मुंबई विद्यापीठ अंतर्गत चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन (अंतरंग) क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सहभाग घेतला. या संघाने प्रथम फेरीमध्ये हिंदुजा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या टीमला हरवून यश संपादन केले.
या अंतरंग क्रिकेट टूर्नामेंटमध्ये एकनाथ म्हात्रे, सचिन पाटील, भाऊ पाटील, महिंद्रा घरत, मोहित गंबास, भाविक देशमुख, स्वप्नील पाटील, अनंत सावंत, वैभव झगडे, एकनाथ पारवे, काशिनाथ हजारी, दिलीप वाक, नितीन वासकर, दीपक पवार, जयंत भोईर व राजेश वासकर या शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला. सचिन पाटील यांना सामनावीर घोषित करण्यात आले.
प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे तसेच प्राध्यापकवृंदाने शिक्षकेतर कर्मचार्यांचे अभिनंदन केले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …