Breaking News

कामोठे वसाहतीमध्ये पाईप गॅसच्या कामादरम्यान स्फोट

दोन कामगारांसह घरातील सदस्य जखमी

पनवेल : वार्ताहर

कामोठे सेक्टर 6 मधील दुधे कॉर्नर सोसायटीमध्ये महानगर गॅसचे कामकाज सुरू असताना गॅस पाईप लाईनमध्ये स्फोट झाल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. या घटनेत दोन कामगार आगीत होरपळले आहेत तसेच घरात असलेले इतर सदस्य किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कामोठे सेक्टर अ मधील दुधे कॉर्नर सोसायटीमध्ये ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या सोसायटीमध्ये महानगर गॅस पाईप लाईनच्या कनेक्शनचे काम सुरू होते. सोसायटीमधील सी विग रूम नंबर 12 मधील रहिवाशी त्रिंबक जाधव यांच्या घरात हे कनेक्शनचे काम सुरू होते. या वेळी घरात पाच सदस्य आणि दोन कामगार होते. गॅस पाईपचे कनेक्शन करताना गॅसचा मेन कॉक चालू होता. गॅसचा सप्लायदेखील सुरू होता. या वेळी घरातील पाईपचा कॉक सुरू असून गॅस लिकेज होत होता. कामकाज सुरू असताना गॅस कामगारांनी शोल्डरीगचे काम सुरू केले याच वेळी लिकेज असलेल्या पाईपने आग पकडली आणि मोठा स्फोट झाला. या आवाजाने इमारतीमधील इतर रहिवाशियाची पळापळ सुरू झाली. हा स्फोट एवढा भयानक होता की, घरातील इतर समान आणि कामगारांना आग लागली नशीब बलवत्तर म्हणून दोन्ही कामगार हे किरकोळ होरपळले आहेत. एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे तर दुसरा कामगार होरपळा असून त्याच्या हाताला आणि छातीला आग लागून तो जखमी झाला आहे. ही आगीची घटना कामोठे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून गॅस सप्लाय बंद केला, आणि पोलिसांनी तत्काळ जखमी कामगारांना कामोठे वसाहतीमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply