Breaking News

अनोळखी महिलेच्या हत्येचा छडा; आरोपी अटकेत

गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने लावला छडा

पनवेल : वार्ताहर

पनवेल-सायन मार्गावरील कोपरखैरणे येथील खाडीलगतच्या झाडाझुडपामध्ये अनोळखी महिला मृतदेह आढळला होता. या  महिलेची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला यश आले आहे. या हत्येतील आरोपीला 48 तासांच्या आत गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे.  कोपरखैरणे येथील कांचनगंगा सोसायटीच्या विरुद्ध बाजूस असलेल्या नाल्यालगत खाडीकडे जाणार्‍या अरुंद रोडच्या डाव्याबाजुच्या झाडाझुडपामध्ये 35 ते 40 वर्ष वयाच्या अनोळखी महिलेची अज्ञात व्यक्तीने तिचा गळा आवळून खून केला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह खाडीमध्ये टाकून दिला होता. या गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वनाथ कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई, हवालदार आतिश कदम, सतिश सरफरे, महेश पाटील, अनिल यादव आदींच्या पथकाने या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला आहे. चौकशीदरम्यान त्यांना ही महिला सफाई कामगार असून तिचे नाव सायरा बानु हासमी आहे व ती मानखुर्द येथे वास्तव्यास असल्याचे माहित पडले. तांत्रिक तपास व गुप्त माहितीदारामार्फत पोलिसांनी राजकुमार पाल (वय 40 वर्ष, धंदा वॉचमन) याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याने सायरा हिने लग्नाचा तगादा लावल्याने तिला कोपरखैरणे येथील कांचनगंगा सोसायटीच्या समोरील नाल्यालगत, खाडीकडे जाणार्‍या अरुंद रोडच्या डाव्या बाजूला, झाडाझुडपामध्ये बोलावून ठार मारल्याचे कबुल केले. कोणताही पुरावा नसताना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने फक्त तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने फक्त 48 तासात हा गुंता सोडवला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply