Breaking News

उलवे नोडमध्ये पार्वतीमाता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उलवे नोड सेक्टर 3 येथील लांगेश्वर महादेव मंदिरात शिवशक्ती नवयुग मित्र मंडळ आणि राजस्थानी प्रवासी संघ उलवे नोडच्या वतीने माता पार्वती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगळवारी (दि. 14) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानिमित्त एक शाम गौ माता के नाम हा भजन संध्या कार्यक्रमदेखील झाला. या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्या योगिता भगत, भाजपचे उलवे नोड 1 अध्यक्ष मदन पाटील, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, विठ्ठल पाटील, वितेश म्हात्रे, पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, उपनिरीक्षक श्री. शेलार, सुहास भगत, दिलीप पाटील, मंजुळा कोळी, विक्रमसिंह चौहान, कानजीभाई पटेल, ईश्वर सिंह, पुनाराम देवासी, नेमाराम पटेल, ललित प्रजापति, प्रवीण गुर्जर, किशन चौधरी, पुरुषोत्तम लिमवत, लादू सिंह, मोहन चौधरी, नरेंद्र शिनोई, मनीष देवासी, सोहन देवासी, बलवंत सिंह, भाना राम, सुनील चौधरी, कैलास चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply