Breaking News

धोकादायक ड्रेनेजचे झाकण बदलले; नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेमुळे पनवेलमधील परदेशी आळी येथील रस्त्यावरील धोकादायक ड्रेनेजचे झाकण बदलण्यात आले आहे. प्रभाग 18 मधील परदेशी आळी येथील महाराणा प्रताप रस्त्यावरील हॅपी होम सोसायटीच्या समोर ड्रेनेजचे झाकण दबले गेले होते. यामुळे अपघात होण्याचे प्रसंग ओढवू शकत होते. एखादे अवजड वाहन त्यावरून जाऊन मोठा धोकादायक खड्डा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकत होती. त्यामुळे एखादी दुर्घटना होऊन दुचाकीस्वार अथवा पादचार्‍यांनाही इजा होण्याची शक्यता होती. या संबंधीची माहिती परिसरातील जागरूक नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली. कोणतीही दुर्घटना होऊ नये याची काळजी घेत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित हालचाली करून दबलेल्या ड्रेनेजच्या झाकणावर बॅरिकेट टाकले व बाजूने दगडे लावली. जेणेकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेतली. तसेच महापालिका अधिकार्‍यांशी बोलणी करून या ड्रेनेज झाकणाचे काम त्वरित करून घेण्यास सांगितले. यावर लगेचच बुधवारी (दि. 29) ड्रेनेज झाकण बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आणि नवीन झाकण फ्रेम सहित लावून घेण्यात आले. नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे दुर्घटना होण्याची संभवना टळली. यामुळे प्रभागातील व परिसरातील नागरिकांनी  विक्रांत पाटील यांचे आभार मानले.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply