Breaking News

दुकानावर मराठी भाषेतील नामफलकासाठी शिवसेना आग्रही

पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन
पनवेल : वार्ताहर
मराठी अस्मिता जपण्यासाठी दुकाने व आस्थापनांच्या नामफलकांवर मराठी भाषेत नाव असलेच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रामधील काही दुकाने, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, उपहारगृहे शासनाच्या नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी. मराठी भाषा दिनानिमित्त, मराठी भाषा अस्मिता जपण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रम, पनवेल महापालिका हद्दीत राबवावे, अश्या मागण्या केल्या आहेत. मराठी भाषा दिन 26 फेब्रुवारी हा असून दुकानांवर व आस्थापनांच्या मराठी पार्टी न लावणार्‍यांवर, आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे इशाराही या वेळी देण्यात आला. या बैठकीमध्ये पनवेल महापालिकाच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त गणेश शेटे उपस्थित होते. आयुक्तांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊन, लवकरच पनवेल महापालिका, सर्व दुकानदारकांना या बाबतचे परिपत्रक काढण्याचे आश्वासन, शिवसेना पनवेल पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.
या वेळी शिवसेना पनवेल पक्षाकडून संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश रानवडे, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, पनवेल उप शहर प्रमुख मच्छिंद्र झगडे, पनवेल विधानसभा महानगर संघटक मंगेश सुधाकर रानवडे आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply